राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

 

‘नो मास्क, नो सवारी’ या मोहिमेची मुख्यमंत्री यांच्याकडून दखल

अकोला,दि. २६ (जिमाका) –  ‘माझे  कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी भूमिका बजावेल. या मोहिमेत नागरिकाचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दृकश्राव्याप्रणालीद्वारे  आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला मोबाईलव्दारे पालकमंत्री ना. बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख आदीची उपस्थिती होती.

‘नो मास्क, नो सवारी’ या मोहिमेची मुख्यमंत्री यांच्याकडून दखल

मा. मुख्यमंत्री यांनी अकोला जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाव्दारे राबविण्यात येणारी ‘नो मास्क, नो सवारी’ व ‘नो मास्क, नो ऍन्टी’ या मोहिमेची दखल घेवून ही मोहिम राज्यात राबविण्याबाबत संबधिताना निर्देश दिले.

यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी शांतपणे साजरा केला. आगामी नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी शासनाकडून नियमावली लवकरच जाहिर केली जाईल असे, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोणतीही मोहिम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असण्याची गरज आहे. आज आपण जनजागृतीद्वारे कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळण्यावर भर दिला पाहिजे, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे  पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच प्रशासनाव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक कुंटूबातील व्यक्तीचा डाटा संकलीत करण्याचे काम चालू आहे. यामुळे  गावात असलेल्या कोमॉर्बीड रुग्ण,  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी  विकार इ. आजाराची वर्गवारी करुन त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर तातडीने उपचार करुन मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल, असे ते म्हणाले.

‘माझे कुंटुब, माझी जबाबदारी’ ही मोहिमेंतर्गत जिल्ह्याचा 66 टक्के भागाची तपासणी करण्यात आली आहे.  यापुढेही मोहिम अधिक गतीने राबविण्यात येणार असून यासाठी निबंध स्पर्धा, स्टीकर, बॅनर तसेच मनपाव्दारे चालविण्यात येणाऱ्या घंटागाडीव्दारे  मोहिमेंची  जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जनजागृतीसाठी पालकमंत्री जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच तज्ञ डॉक्टर यांच्या मुलाखती घेऊन सोशल मिडीयाव्दारे प्रसारित करण्यात येत आहेत.

 

 


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...